जावई की सैतान? सुरेश निकमने धारधार शस्त्राने पत्नी, मेहुणा, आजे सासूला संपवलं 

Crime News –  शिर्डीत (Shirdi Murder Case) सावळीविहीर  गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली आहे. हल्ल्यात मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबिक वादातून  हत्याकांड झाल्याची  प्राथमिक माहिती  समोर आली आहे.

शिर्डीच्या  सावळीविहीर  गावात  राहणाऱ्या आरोपी  सुरेश निकम  याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळीशी अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद असल्याची माहिती मिळत आहे. याच वादातून रागाच्या भरात आरोपी सुरेश निकमने घरात घुसून वार केले. त्यामध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू जागीच ठार झाल्या. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

यामध्ये सासू, सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाली. जखमींना नातेवाईकांनी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले  असून  कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-