मी आणि धोनी कधीही जवळचे मित्र नव्हतो; Yuvraj Singhचा खळबळजनक खुलासा

Yuvraj Singh on Ms Dhoni: 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) सहकारी असलेल्या युवराज सिंगने (Yuvraj Singh) एका मुलाखतीत धोनीसोबतच्या मैत्रीबाबत खळबळजनक विधान केले आहे. धोनीसोबतच्या मैत्रीबाबत युवराज सिंग म्हणाला की, त्याच्यात आणि धोनीमध्ये कधीच मैत्री नव्हती. क्रिकेट खेळल्यामुळेच त्यांची मैत्री झाली होती. या मुलाखतीत युवराज सिंग त्याच्या कारकिर्दीत एमएस धोनीसोबत घालवलेल्या वेळेबद्दल मोकळेपणाने (Yuvraj Singh And MS Dhoni Friendship) बोलला आहे.

युवराज सिंगने टीआरएस क्लिपवरील चॅट शो दरम्यान सांगितले की, तो आणि धोनी कधीही जवळचे मित्र नव्हते. क्रिकेट खेळल्यामुळेच आमची मैत्री झाली. धोनी आणि माझ्या जीवनशैलीत खूप फरक होता. त्यामुळे आमच्यात घट्ट मैत्री झाली नाही. मैदानाबाहेर तुमचा सहकारी तुमचा चांगला मित्र असेलच असे नाही. प्रत्येकाची जीवन जगण्याची शैली वेगळी असते.

‘आमच्या दोघांमध्ये मतभेद होते’
युवराज सिंग म्हणाला की, आम्ही जेव्हा जेव्हा मैदानात आलो तेव्हा देशासाठी शंभर टक्के देत असू. धोनीच्या कर्णधारपदाच्या आणि माझ्या उपकर्णधारपदाच्या काळात आमच्या निर्णयांमध्ये मतभेद असायचे. त्याचे काही निर्णय मला आवडले नाहीत आणि त्याला माझे काही आवडले नाहीत. हे प्रत्येक संघात घडते. युवराजने सांगितले की, एकदा त्याने धोनीला त्याच्या शतकात मदत केली होती आणि धोनीनेही त्याला त्याच्या अर्धशतकात मदत केली होती.

करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर धोनीचा सल्ला घेतला
युवराज सिंगने असेही सांगितले की जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर होता तेव्हा तो त्याच्या भविष्याबद्दल स्पष्ट नव्हते. याबाबत धोनीला सल्ला विचारला असता तो म्हणाला की, सध्या निवड समिती माझ्याबाबत विचार करत नाही. मला खरी परिस्थिती जाणून घ्यायची होती. ही घटना 2019 च्या विश्वचषकापूर्वी घडली होती. युवी पुढे म्हणाला की, आम्ही दोघेही निवृत्त झालो आहोत आणि आता आम्ही जेव्हाही भेटतो तेव्हा मित्रांसारखे भेटतो.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, शिंदेंनी तात्काळ पाठवली मदत

‘हा’ हर्बल चहा तुम्हाला सर्दी, खोकला आणि विषारी हवेपासून वाचवू शकतो

लाजवाब! विराटने वाढदिवशी झळकावले झंझावाती शतक, तेंडूलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी