Sonu Sood | अनोळखी व्यक्तीने भरलं सोनू सूदच्या जेवणाचं बिल, कारण ऐकून भारावून गेला अभिनेता

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा गरजू लोकांना मदत करताना दिसतो. कोरोनाच्या काळातही त्याने अनेकांना मदत केली. एवढेच नाही तर मदत करण्याचे हे मिशन त्याने आजही सुरू ठेवले आहे. त्याच्या घराबाहेर अनेकदा गरजू लोकांची गर्दी पाहायला मिळते.

आता अलीकडेच एका व्यक्तीने अभिनेत्याला आश्चर्यचकित केले. एका अज्ञात चाहत्याने अभिनेत्याच्या जेवणाचे बिल नकळत भरले. सोनू सूदसाठी एक सुंदर नोट देखील सोडली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्याच्या जेवणाचे बिल दिले
सोनू सूद एका रेस्टॉरंटमध्ये जेवत होतेा तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या जेवणाचे संपूर्ण बिल दिले. यासोबतच अभिनेत्यासाठी एक चिठ्ठीही सोडण्यात आली होती. त्या चिठ्ठीत ‘तुम्ही देशासाठी केलेल्या चांगल्या कामाबद्दल तुमचे खूप खूप आभार’ असे लिहिले होते.

सोनू सूदने (Sonu Sood) आपल्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर ही नोट शेअर केली आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे कोणी केले हे मला माहित नाही, परंतु कोणीतरी रेस्टॉरंटमधील आमच्या जेवणाचे संपूर्ण बिल दिले आणि ही सुंदर नोट सोडली. या भावनेने खरोखर हृदयाला स्पर्श केला. धन्यवाद मित्रा,’

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?