पॅडल न मारताच चालणारी सायकल, एकदा चार्ज केल्यानंतर ८० किमीपर्यंत धावते; किंमत फक्त…

Special Cycle : वाहन व्यवसाय सध्या तेजीत आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे आविष्कार. रोज काही ना काही नवीनपणा आणून कार आणि बाइक्सचा चेहरामोहरा बदलला जात आहे. याच साखळीत आता एक अप्रतिम सायकल बनवण्यात आली आहे. गोरगरीब कुटुंबातील मुले सायकलवरून दूरवर जात असल्याचे दिसून येते. आजच्या जमान्यात उष्णता खूप वाढली आहे आणि वरून सायकल चालवणे अवघड होऊन बसले आहे, पण काय करणार, मोटार बाईक घेण्यासाठी फारसे पैसे गरिबांकडे नसतात. मात्र, आता गरिब कुटुंबातील मुलांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. परवडणारी सायकल सादर करण्यात आली असून, ती एका विद्यार्थ्याने स्वतः बनवली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी पेडल न चालवता दूरपर्यंत जाऊ शकतात.

राजस्थानमधील कोटा येथील वीरेंद्र शुक्ला याने ही सायकल बनवली आहे. शुक्ला हा बारावी पास तरुण आहे. इलेक्ट्रिक सायकलचा शोध त्याने लावला आहे. या सायकलची खासीयत म्हणजे ती एकदा चार्ज केल्यावर 80 किलोमीटरपर्यंत चालते. तसेच सामान्य सायकलपेक्षा वेगाने धावते. शुक्लाने दिलेल्या माहितीनुसार, या सायकलमध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रिक मोटर असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय यामध्ये रिचार्जेबल बॅटरीही बसवण्यात आली आहे.

ही सायकल किती वेगाने धावते?
ही सायकल 25 ते 30 किमी/ताशी वेगाने धावते. त्याची किंमतही कमी आहे आणि त्यात पेट्रोल किंवा डिझेल टाकले जात नाही, त्यामुळे लोकांना कुठेही जाण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही आणि ते फक्त या सायकलने प्रवास करू शकतात.

वीरेंद्र शुक्ला सांगतात की, 25,000 रुपयांना इलेक्ट्रिक सायकल मिळेल. नवीन इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी 70,000 ते 80,000 रुपये खर्च येतो, तिथे ही सायकल बनवण्यासाठी 25,000 रुपये खर्च येतो, असे ते म्हणाले.