बॉयफ्रेंडसाठी तमन्नाने मोडली १८ वर्षांची नो किसींग पॉलिसी, ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये दिले इंटिमेट सीन

अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamanna Bhatia) अनेक साऊथ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पडद्यावरच्या तिच्या वेगळ्या अभिनयासाठी ती ओळखली जाते. तमन्ना भाटियाने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे, परंतु तिने अद्याप कोणत्याही प्रकारचे किसिंग किंवा रोमँटिक सीन पडद्यावर दिलेले नाहीत. ती नेहमीच नो किसिंग पॉलिसी अंतर्गत काम करते. मात्र आता तमन्ना भाटियाने आपला 18 वर्षांचा हा नियम मोडण्याचा निर्णय घेतला आहे. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे तिने केवळ एका अभिनेत्यासाठी नो किसिंग पॉलिसीचा नियम मोडला आहे.

विजय वर्मा (Vijay Varma) असे या अभिनेत्याचे नाव आहे. वास्तविक तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा सध्या त्यांच्या पुढील प्रोजेक्ट ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) साठी चर्चेत आहेत. अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाउंटवर ‘लस्ट स्टोरीज 2’ चा टीझर शेअर केला आहे. ज्यामध्ये या प्रोजेक्टशी संबंधित सर्व कलाकार त्यांच्या भूमिकांबद्दल बोलत आहेत. टीझरमध्ये प्रत्येकजण वासना आणि प्रेमाच्या सीनबद्दल बोलत आहे.

या व्हिडिओमध्ये तमन्ना भाटियाला जेव्हा कळते की तिला विजय वर्मासोबत चुंबन आणि रोमँटिक सीन करायचे आहेत, यावर ती मस्त म्हणत प्रतिक्रिया देते. म्हणजे तमन्नाला विजयसोबत किसिंग सीन करायला काहीच हरकत नाही. याबरोबरच तमन्ना ‘लस्ट स्टोरीज 2’च्या ट्रेलरमध्ये विजय वर्मासोबत इंटीमेट सीन देतानाही दिसली आहे.