हरी नरकेंच्या उपचारात हलगर्जीपणा? ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनावणींचा खळबळजनक आरोप

Hari Narke Passes Away : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके (Hari Narke Passed Away) यांचे निधन झाले आहे. नरके यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत संजय सोनवणी यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबईतील लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारादरम्यान निष्काळजीपणा केल्याचं आणि हृदयविकाराचा धोका असताना त्यांच्यावर अस्थमाचे उपचार केल्याचा आरोप संजय सोनावणी यांनी केला आहे. नरके आणि त्यांच्यात झालेल्या whatsapp चॅटचा दाखला देत त्यांनी हे आरोप केले आहे.

संजय सोनवणी यांची फेसबुक पोस्ट

प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत.
हरीभाऊंचा मला आलेला २२ जून २०२३चा whatsapp संदेश-
“प्रिय भाऊ, नमस्कार
गुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊन पुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे. आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला. मात्र बीपी 60 90 असे लो असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो.

जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते. हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता. लीलावतीमधील नामवंत Cardeologist, pulminologist खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले.

लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला. regards. [14:29, 22/06/2023] Hari Narke 2: हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे .. पण त्यांनी वाचलाच नाही.आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21पट झाला होता. आता बरा होतोय.” माझा हसता खेळता ज्येष्ठ बंधू गेला. काय म्हणू?