SRH IPL Highest Total | अवघ्या 19 दिवसांनंतर हैदराबादने स्वतःचाच विक्रम मोडला, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली

SRH IPL Highest Total | सनरायझर्स हैदराबादने अवघ्या 19 दिवसांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली होती, जी आता त्यांनीच मोडली आहे. आरसीबीविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या (SRH IPL Highest Total) उभारली आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने स्कोअर बोर्डवर 3 गडी गमावले.

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या
आरसीबीच्या गोलंदाजीवर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी कहर केला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. हेडने 41 चेंडूत 102 धावांची तुफानी खेळी खेळली. तर, अभिषेकने 22 चेंडूत 34 धावा केल्या. यानंतर हेनरिक क्लासेनने जबाबदारी स्वीकारली आणि 31 चेंडूत 67 धावांची स्फोटक खेळी खेळली.

शेवटच्या षटकांमध्ये ॲडम मार्करामने स्फोटक खेळ करत 17 चेंडूत 32 धावा केल्या, तर अब्दुल समदने 10 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. अशाप्रकारे प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने स्कोअर बोर्डवर 3 गडी गमावून 287 धावा केल्या, जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेडने झंझावाती शतक झळकावले
ट्रॅव्हिस हेडने आपल्या स्फोटक खेळीने चाहत्यांचे मनोरंजन केले. हेडने 41 चेंडूंचा सामना करत 102 धावांची शानदार खेळी केली. हेडने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार मारले. हेडने अभिषेक शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली.

आयपीएलमधील चौथे जलद शतक
ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 39 चेंडूत शतक झळकावून ॲडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडीत काढला आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा हेड हा चौथा फलंदाज ठरला आहे. गिलख्रिस्टने 2008 मध्ये 42 चेंडूत शतक झळकावले होते.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने 2013 मध्ये केवळ 30 चेंडूत शतक झळकावले होते. त्याचबरोबर युसूफ पठाणचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पठाणने मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूत शतक झळकावले. डेव्हिड मिलरने आरसीबीविरुद्ध 38 चेंडूत शतक झळकावले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Sharad Pawar : शरद पवारांची सारवासारव; सुनेत्रा पवारांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले…

Sunetra Pawar | रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, धायरीत जंगी स्वागत