महाज्योतीमार्फत फेलोशिप मिळावी म्हणून २१ दिवसापासून विद्यार्थ्यांचे उपोषण; मुर्दाड सरकारला जाग येईना

मुंबई – गेले 21 दिवस झाले महाज्योती संस्थेकडून UGC च्या नियमानुसार सारथी – बार्टी प्रमाणे PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना Fellowship देण्यात यावी यासाठी OBC, VJ NT, SBC प्रवर्गातील संशोधक विद्यार्थी आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज गुढीपाडवा आहे सन्माननीय ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार त्यांच्या घरी आनंदोत्सव साजरा करत असतील आणि येथे आझाद मैदानावर ओबीसी समाजातिल PhD करणारे विद्यार्थी भर उन्हात उपाशी पोटी उपोषणाला बसले आहेत.

15 मार्च रोजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपोषणाला बसलेल्या मुलांना आझाद मैदान पोलीस चौकी पोलिसा करवी घरी बोलवुन अपमानास्पद वागणूक दिली. PhD करून तुम्ही चपराशी होणार आहे. तुम्हाला पैसे देऊन मी माझा मतदारसंघ वाऱ्यावर सोडून टाकतो. उपोषण सोडले नाही तर बघुन घेईल. साल्यानो भाड्यानो असे शब्द त्यांनी विधार्थ्यांसाठी वापरले.असा देखील आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

त्यांचे PA राजु संतोषवार यांनी उपोषण सोडले नाही तर करीअर उद्ध्वस्त करण्याची धमकी संशोधक विद्यार्थ्यांना दिली. तसेच आझाद मैदान पोलीस चौकीचे पोलीस विद्यार्थ्यांना भेटीसाठी होऊन गेले होते त्यांना देखील त्यांच्या PA ने अपमानास्पद वागणूक दिली. सन्माननीय मंत्री महाराष्ट्रभर ओबीसी चे एकमेव कैवारी असल्याचे सांगत मेळावे घेत हिंडतात आणि दुसरीकडे ओबीसी विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करत आहेत.असा आरोप देखील या विद्यार्थ्यांनी केला आहे.