अभिनेत्री रिचा चड्ढावर Indian armyचा अपमान केल्याचा आरोप, मागावी लागली माफी

Richa Chadha: बऱ्याचदा सिने-अभिनेते किंवा अभिनेत्रींची एखाद्या सामाजिक विषयावर बोलताना जीभ घसरते आणि यामुळे ते ट्रोलचा शिकार बनतात. बॉलीवूड अभिनेत्री रिचा चड्ढा ही एका वादग्रस्त ट्वीटनंतर संकटात सापडली आहे. या अभिनेत्रीने भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप आहे.

रिचा चड्ढाने आपल्या ट्वीटमध्ये सेनेतील नॉर्दर्न कमांडच्या कमांडरच्या वक्तव्याचा संदर्भ देत, तो चीनच्या सीमेला लागून असलेल्या गलवानमध्ये समोर आलेल्या एका जुन्या घटनेशी जोडला. ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोलचा सामना करावा लागला. अखेर तिने आपले ट्वीट डीलिट करत भारतीय सेनेची क्षमा मागितली.

काय म्हणाली रिचा चड्ढा?
रिचा चड्ढाने केलेले ट्विट भाजपाने पब्लिसिटी स्टंट आणि लष्कराचा अपमान असल्याचे म्हटले आहे. लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले की, भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत घेण्यासारखे आदेश पार पाडण्यासाठी तयार आहे. या विधानाचा हवाला देत रिचा चड्ढाने लिहिले की, ‘गलवान हाय म्हणत आहे.’

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी रिचा चड्ढाच्या या ट्वीटला भारतीय सेनेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ‘अभद्र ट्विट. रिचा चड्ढा काँग्रेस आणि राहुल गांधी यांची पुजारी आहे, त्यामुळे या ट्विटमध्ये तिची भारतविरोधी विचारसरणी स्पष्टपणे दिसत आहे. म्हणूनच मी मुंबई पोलिसांकडून तिच्यावर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करतो.’

अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिचा चड्ढाने लष्करावर टीका करत भारत आणि चीनमधील गलवान संघर्षात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाची खिल्ली उडवल्याचा आरोप लावला आहे.

रिचा चड्ढाने मागितली क्षमा
लष्करी अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर ट्विट करून वादात सापडलेली अभिनेत्री रिचा चड्ढा हिने अखेर माफी मागितली आहे. रिचा चड्ढाने गलवनच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आणि लष्कराचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता असे म्हटले आहे.