Yashasvi Jaiswal | यशस्वी भव: … जैस्वालचे इंग्लंडविरुद्ध खणखणीत शतक, केवथ ७ सामन्यात जमवल्या ७३५ धावा

Yashasvi Jaiswal Test Century : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करत 445 धावा केल्या. यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ 319 धावाच करू शकला. यासह टीम इंडियाला पहिल्या डावाच्या आधारे 126 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यानंतर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) दुसऱ्या डावात भारतासाठी शानदार फलंदाजी करत उत्कृष्ट शतक झळकावले.

जैस्वालने शतक झळकावले
यशस्वी जैस्वालने डावाच्या सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावात लवकर बाद झाला. यानंतर यशस्वीने धावा काढण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याने स्फोटक फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने 122 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो सध्या 100 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे तिसरे शतक आहे.

इंग्लंडविरुद्ध सलग दुसरे कसोटी शतक
यशस्वी जैस्वाल जबरदस्त फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने उत्कृष्ट द्विशतक झळकावले. त्यानंतर त्याने 209 धावांची खेळी केली. जयस्वालने 2023 साली टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शतक झळकावले. त्याने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांमध्ये 735 धावा केल्या आहेत ज्यात तीन शतकांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?