राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी गिरीश गुरुनानी यांची निवड

पुणे : कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्षपदी आज स्थानिक युवा नेते  गिरीश गुरूनानी यांची निवड एकमताने करण्यात आली.एका सामान्य व अराजकीय घरातील कार्यकर्त्याच्या असामान्य सामाजिक आणि राजकीय कार्याची दाखल घेत कोथरूड मधील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अध्यक्षपदासाठी गुरूनानी यांच्या नावाला समर्थन दर्शविले.

पुण्याचे माजी उपमहापौर  दीपक मानकर, शहर अध्यक्ष  प्रशांत जगताप, कोथरूड राष्ट्रवादी अध्यक्ष  हर्षवर्धन मानकर व शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे यांनी गुरूनानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केली.

कोथरूड भागात गुरूनानींचा अनेक आंदोलनात सहभाग होता. इंधन दरवाढ व पुणे महानगर पालिकेच्या अनियमित कारभारविरोधात केलेल्या अनोख्या आंदोलनाने त्यांना युवकांची पसंती मिळवून दिली. तसेच अंधशाळा व एड्सग्रस्त मुलांसाठी करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल पक्षाने घेतल्याचे सूत्रांकडून कळते.

पद मिळाल्यानंतर युवांचे प्रश्न आणखीन प्रखरतेने समाजासमोर मांडून अत्यंत जबाबदार पणे त्यावर तोडगा काढण्याचे कार्य करणार असल्याचे गुरूनानी यांनी यावेळी माध्यमांशी बोलत असताना सांगितले.