एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं; सुहास कांदे यांच्या आरोपांनी खळबळ

नाशिक – शिवसेनेत एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली असल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकी आली. तरीही त्यांना झेडप्लस सुरक्षा दिली नाही. गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना सांगितलं शिंदेंना सुरक्षा देऊ नका. हा काय प्रकार आहे. मुंबई बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी याकूब मेमनच्या (Yakub Memon) फाशीला विरोध अस्लम शेख आणि नवाब मलिक (Aslam Sheikh and Nawab Malik) यांनी विरोध केला होता. त्यांच्या मांडिला मांडू लावून बसायचं का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रेल्वेत बॉम्बस्फोट झाले. त्यात दाऊदचा हात असल्याचं उघड झालं. त्या दाऊदच्या सोबत नवाब मलिक यांचं कनेक्शन असल्याचं उघड झालं. त्यांच्या मांडिला मांडी लावून बसायचं का? ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली. त्यांना टी बाळू म्हणून हिणवले. त्यांच्या मांडिला मांडी लावून बसायचं का?, असा सवाल आदित्य यांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.