sunetra pawar | जनतेच्या प्रेमाची सावली उन्हाचा तडाखा जाणवूच देत नाही

sunetra pawar | ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकांची (LokSabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाखा इतका असतांनाही उमेदवारांना लोकांचा उत्सुर्फ प्रतिसाद बघायला मिळत आहे. याचाच अनुभव बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना आला. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत तो सुखद अनुभव कथन केला आहे.

सुनेत्रा पवार (sunetra pawar ) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की,  बारामती लोकसभा (Baramati LokSabha 2024) मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना येणारे अनेक अनुभव भारावून टाकणारे ठरत आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकाकडून देखील मिळत असलेले प्रेम पाहून अनेकदा गलबलूनच येते. असाच एक अनुभव आज पुन्हा एकदा आंबेगाव येथे घेतला.

येथील नागरिकांशी संवाद साधत असताना भर तळपत्या उन्हात मी महायुतीच्या पदाधिकारी, स्थानिक नागरिकांसह रस्त्याने चालतच फिरत होते. जनतेच्या प्रेमाची सावली उन्हाचा तडाखा जाणवूच देत नव्हती. याच प्रेमाची शितल झुळूक सफाई कामगार महिला भगिनींनी देखील दिली. माझ्या डोक्यावर त्यांनी त्यांच्या प्रेमाची सावली पांघरली. त्याचे झाले असे, की भर दुपारच्या उन्हात रस्त्यावरून जात असताना माझ्या स्वागतासाठी काही सफाई कामगार महिला उभ्या होत्या. त्या सर्वजणी मला भेटायला आल्या.

माझ्याशी आपुलकीने बोलल्या. त्यांनी आणलेला बुके मला प्रेमाने दिला. मला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांचे मोल अनमोल आहे. त्यामुळे त्या शुभेच्छांचा मी विनम्रतापूर्वक स्वीकार केला. समाजाच्या सर्वांगीण विकासासह या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन, अशी मनाशी आधीच बांधलेली खूणगाठ निर्धाराने आणखी घट्ट केली. भरल्या मनाने त्यांचे आभार मानले. असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला