अजितदादांचं भाषण झालं नाही त्यामागे फडणवीस मास्टरमाईंड – सुनिल शेळके

पुणे – देहूतील कार्यक्रम भाजप अध्यात्मिक आघाडीचा होता. त्या कार्यक्रमात वारकऱ्यांना कुठलंही स्थान दिलं गेलं नाही. दिखाव्यासाठी त्यांना मोदींच्या भाषणाला बसवलं गेलं, मात्र त्यांचा कुठलाही मान सन्मान ठेवला गेला नाही.असा आरोप मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण काल व्हायला हवं होतं. पण त्यांचं भाषण न होण्यामागे तसेच संपूर्ण प्रोटोकॉल बदलण्याचं काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं, तेच यापाठीमागचे मास्टरमाईंड आहेत. त्यांच्या बरोबर तुषार भोसले यांनीही उपद्व्याप केले, असं शेळके म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील तुकोबारायांच्या शिळा मंदिराचं उद्घाटन झालं. त्यावेळी अजित पवार यांना भाषणापासून वंचित ठेवलं गेलं. याच घटनेला राष्ट्रवादीचे नेते भाजपला जबाबदार धरुन टीकेचे झोड उठवत आहेत.