‘काश्मिरी पंडितांचं पलायन आणि गोरक्षकांडून होणाऱ्या हिंसेत काय फरक आहे?’

Mumbai  – अभिनेत्री साई पल्लवीने (Actress Sai Pallavi) धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेचा निषेध करताना काश्मिरी पंडितांचं पलायन ( Kashmiri Pandits) आणि गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसेची तुलना केली आहे. ‘वीरता पर्वम’ (Veerata Parvam) या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर एक तेलुगू यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने ही तुलना केली आहे.या भूमिकेनंतर साई पल्लवीवर सोशल मीडियातून टीका केली जात आहे, तर काही लोकांनी तिचं समर्थन देखील केलं आहे.

काश्मीर फाईल्समध्ये दाखवलं गेलं आहे की त्यावेळी कशा पद्धतीने काश्मिरी पंडितांना मारलं गेलं होतं. हा मुद्दा जर तुम्ही धार्मिक दृष्टिकोनातून घेत असाल तर अलिकडेच गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम ड्रायव्हरला मारलं आणि ‘जय श्रीराम’चा नारा देण्यास भाग पाडलं गेलं. या दोन्ही घटनांमध्ये काय फरक आहे? असा सवाल साई पल्लवीने केला आहे.

मुलाखतीदरम्यान सई पल्लवीने सांगितले की, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांचे हत्याकांड दाखवण्यात आले आहे. दुसरीकडे, हिंसाचार आणि धर्म या तराजूत तोलला गेला, तर काही काळापूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करून जय श्री राम म्हणण्यास सांगितले होते. आता या दोन घटनांमध्ये काय फरक आहे ते सांगा