उगाच माना शेट्टींना ‘लेडी अंबानी’ म्हणत नाहीत! सुनील शेट्टींपेक्षाही कितीतरी पटींनी जास्त आहे संपत्ती

नुकताच भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (KL Rahul Athiya Shetty Wedding) यांचा विवाहसोहळा पार पडला. अथियाचे वडील सुनिल शेट्टी (Sunil Shetty) यांच्या खंडाळ्यातील फार्महाउसवर १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी सातफेरे घेतले. गेली काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर त्यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याचा निर्णय घेतला.

राहुल आणि अथियाच्या लग्नानंतर दोघांच्याही कुटुंबियाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. त्यातही प्रसिद्धीपासून दूर राहणारी अथियाची आई माना शेट्टी यांच्या चर्चा तर मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या आहेत.

तसे, सुनील शेट्टी (Sunil Shetty) हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. अभिनेता म्हणून सुनील शेट्टीने करोडोंची संपत्ती कमावली आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की, त्यांची पत्नी (Sunil Shetty Wife) माना शेट्टीची (Mana Shetty) संपत्ती त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. 100 कोटींच्या संपत्तीमुळे माना शेट्टी (Mana Shetty Net Worth) यांना ‘लेडी अंबानी’ (Lady Ambani) असेही संबोधले जाते. त्या एक व्यावसायिक महिला आहेत, ज्या फॅशन डिझायनर म्हणून काम करतात.

फॅशन डिझायनरसह रिअल इस्टेट व्यवसायही पाहतात
ऑगस्ट 1965 मध्ये जन्मलेल्या माना शेट्टींचे खरे नाव मनीषा कादरी आहे. 1991 मध्ये त्यांनी सुनील शेट्टींसोबत लग्न केले. माना आणि सुनील शेट्टी यांना दोन मुले आहेत. त्यांची मुलगी अथिया शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे आणि ती चांगली कामगिरी करत आहे. त्यांचा मुलगा अयान शेट्टीही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. फॅशन डिझायनरसोबतच माना शेट्टी निर्माता आणि रिअल इस्टेटचा व्यवसायही करतात.

माना शेट्टींची एकूण संपत्ती
त्यांच्याकडे एकापेक्षा आलिशान फ्लॅट, वाहने, कार, बाइक्स इ. आहेत. सुनील शेट्टींबद्दल बोलायचे झाले तर, ते चित्रपटांमध्ये काम करून आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून वर्षाला 6 कोटींहून अधिक कमावतात. तर त्यांची एकूण मालमत्ता सुमारे 81 कोटी रुपये आहे. पण त्यांच्या पत्नीची संपत्ती यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. माना शेट्टी त्यांच्या व्यवसायातून करोडोंची कमाई करते. त्यांच्या एकूण मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर, माना शेट्टींची एकूण संपत्ती सुमारे 700 कोटी रुपये आहे.

अनेक महागड्या वाहनांची मालकीण 
माना शेट्टी यांच्याकडे आणि सुनील शेट्टींकडे टोयोटा प्राडो, लँड क्रुझर आणि जीप रँग्लर यांचा समावेश असलेल्या वाहनांचा चांगला संग्रह आहे. याशिवाय सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांच्या मालमत्ताही देशाच्या विविध भागात आहेत.