Nilam Gorhe | सुनबाईला पाठवा दिल्लीत अन् लेकीला ठेवा गल्लीत, निलम गोऱ्हेंचे बारामतीकरांना आव्हान

Nilam Gorhe | महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज आज सादर केला. त्याआधी महायुतीची मोठी सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह महायुतीचे सर्वच नेते उपस्थित होते. तर यावेळी सुनबाईला पाठवा दिल्लीत अन् लेकीचा ठेवा गल्लीत असे विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केलंय.

यावेळी निलम गोऱ्हे म्हणाल्या की,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात आपल्या सरकारने अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये मराठा आरक्षणावर फार मोठा अभ्यास करून कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा प्रश्न सोडविला आहे. मागील काही वर्षात अनेक प्रकल्प जाहीर होत होते. मात्र त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात झालेली कुठेही दिसत नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार जे बोलते ते करून दाखवत आहे.

मोदी सरकारच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प  तसेच प्रलंबित असलेली काम पुर्ण झाली आहेत. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टिका करताहेत. परंतु आपल्या राजकारणात नेहमी म्हटलं जातं की, एका पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. यातच आता बारामतीत अजितदादांचं निवडणुकीचं काम सांभाळत होत्या. त्या सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन अजितदादांनी एक आदर्श घालून दिलाय. सुनेत्रा पवार यांना दिल्लीमध्ये जाण्याची संधी दिली आहे. असेही त्या म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात