आयपीएलवर फिक्सिंगचे सावट! मोहम्मद सिराजला देण्यात आलेली मोठ्या रक्कमेची ऑफर

क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा फिक्सिंगची (Match Fixing) बाब समोर आली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACU) मोठी माहिती दिली होती. त्याने सांगितले की, या वर्षी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी (India vs Australia) एका व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला होता.

त्या व्यक्तीने सिराजला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून टीममधील माहिती मागितली होती. त्या बदल्यात त्यांनी मोठ्या रकमेची लोभ दिले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली होती. फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर 4 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली होती.

सिराजने लगेच बीसीसीआयला याची माहिती दिली
या माहितीनंतर बीसीसीआयची एक तुकडी कामाला लागली आणि वेगाने तपास करत चालकाला अटक केली. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या व्यक्तीने सिराजशी संपर्क साधला तो बुकी नसून तो हैदराबादचा ड्रायव्हर होता जो सामन्यांवर सट्टेबाजीचे व्यसन करत होता.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सिराजशी संपर्क करणारा कोणताही बुकी नव्हता. तो हैदराबादचा ड्रायव्हर आहे, जो सामन्यांवर सट्टा लावतो. सट्टेबाजीत त्याने बरेच पैसे गमावले होते. या कारणास्तव त्यांनी संघाच्या अंतर्गत माहितीसाठी सिराजशी संपर्क साधला होता. सिराजने तत्काळ याची माहिती दिली.’

चालकाला अटक करण्यात आली
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्या चालकाला अटक करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले, ‘सिराजने माहिती दिल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला अटक केली. आता त्याची चौकशी सुरू आहे. उर्वरित माहितीची प्रतीक्षा आहे.’