Sunil Tatkare | दुसर्‍याचं वाकून बघण्यापेक्षा आपलं काय आहे ते वाकून बघा;तटकरेंचा जितेंद्र आव्हाड यांना टोला…

Sunil Tatkare – महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाची बोलणी एक – दोन दिवसात पूर्ण होईल. ४८ जागांचे वाटप सन्मानपूर्वक शुक्रवार किंवा शनिवारी होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली.

महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून संबंध चर्चा करणे व ४५ +उद्दीष्ट असल्याने आम्ही सर्वच गोष्टींचा आढावा घेत आहोत. त्यामुळेच एक – दोन दिवसांचा विलंब होत आहे पण तो फार विलंब आहे असे मला वाटत नाही असेही सुनिल तटकरे ( Sunil Tatkare) यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

आयुष्यभर बाष्कळपणाचे आणि सतत खोटे बोलणारे आव्हाड आहेत. एकतर ती याचिका काय होती तर आम्हाला चिन्ह मिळू नये ते रद्द करावे. मूळ याचिकेचा गाभा असा होता की, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दिलेली मान्यता असेल किंवा घड्याळ हे चिन्ह वापरण्यासाठी जी मान्यता दिली ती रद्द करावी, त्याला स्थगिती द्यावी त्यासाठी हा अट्टाहास केला गेला होता. त्यांना मात्र चपराक बसली आहे. घड्याळ चिन्ह वापरायला परवानगी दिली. त्यात सर्वोच्च न्यायालयाला जाहिरात देताना असे का म्हणावे लागले तर त्यांनी युक्तिवाद केला की, शरद पवार नेतृत्व करत असले तरी घड्याळ हे चिन्ह इतके रुजले आहे की पवारसाहेबांना मानणारा वर्ग देखील घड्याळ चिन्हाला मतदान करु शकतो त्यामुळे आमचा पराजय होऊ शकतो असे बोलण्याची दारुण पाळी युक्तिवादामध्ये आली हे सोयीस्करपणे काही लोक विसरतात असा टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.

इतके वर्ष वापरलेले चिन्ह आणि . जनमानसात रुजलेले असल्याने हे झालेले आहे. एकीकडे एक बोलणं आणि दुसरीकडे युक्तिवाद करताना केविलवाणा प्रयत्न करणे हेच या त्यांच्या याचिकेत दिसले. आम्हाला मिळालेले चिन्ह थांबवावे हा त्यामागचा अट्टाहास होता. मात्र तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे या निर्णयाने आम्ही समाधानी आहोत असेही सुनिल तटकरे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

अटी शर्थी म्हणजे काय तर घड्याळ चिन्ह आमचे आहे. त्यांना भीती आहे की, घड्याळ चिन्हामुळे शरद पवारसाहेबांना मानणारा मतदार हा त्यांना मतदान करणार नाही ही भीती घालवण्यासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत की, आम्हाला घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मिळाले आहे. तेच चिन्ह घेऊन आम्ही निवडणूकीला सामोरे जाणार आहोत हेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

सर्रास खोटं बोलणे आणि विपर्यास करणे ही त्यांची आयुष्यातील भूमिका राहिलेली आहे. एकदाच्या जागा वाटप करा आमच्याबद्दल कशाला तुम्ही काळजी करताय तुमच्या वाट्याला किती जागा येतात ते एकदा जाहीर करा… दुसर्‍याचं वाकून बघण्यापेक्षा आपलं काय आहे ते वाकून बघा असा जोरदार टोला सुनिल तटकरे यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या :

NCP | अजितदादांचा धडाका; भारत राष्ट्र समितीला दिला दणका; मातब्बर नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

LokSabha Election 2024 | भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ajit Pawar | अजित पवारांना गुर्मी, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली