LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024) महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्याने इतर पक्षांनी आपली उमेदवारी घोषित केली नसल्याचे चित्र आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात  (LokSabha Election 2024) महायुतीत कलगीतुरा सुरु असून माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहे.

या मुद्द्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भाष्य केले आहे. विजय शिवतारे आणि अजितदादा पवार यांचे व्यक्तीगत काही नाही. २०१९ मध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघातील संजय जगताप यांची कॉंग्रेसची जागा होती. कॉंग्रेसला विजयी करण्यासाठी आणि शरद पवारांबद्दल विजय शिवतारे यांनी जे उद्गार काढले ते अजितदादांना पटले नाहीत. मात्र आता बालवाडीतील लोक काहीही बोलत असतील त्यांना अजूनही शरद पवार कळायचे आहेत. परंतु त्यांची फारशी दखल आम्ही घेत नाही अशी मिश्किल टिप्पणी करतानाच त्या कारणासाठीच अजितदादांनी विडा उचलला आणि असे शत्रूत्व निर्माण झाले. ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, शरद पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते. आज जे टिकाटिपण्णी करत आहेत तशी वस्तुस्थिती नाहीय असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

हर्षवर्धन पाटलांच्याबाबतीत काय घडले. २०१४ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आणि कॉंग्रेसमुळे आम्ही स्वतंत्र लढलो. त्यामुळे दत्तामामा भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर अधिकृत निवडून आले. २०१९ मध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली असे सांगतानाच पक्ष टिकवण्यासाठी अजितदादांनी केलेली मेहनत आणि आज जो पक्ष उभा आहे त्यात अजितदादा व्यतिरिक्त कुणाचे योगदान नाही. म्हणूनच इतके आमदार निवडून आणता आले आणि २०१९ मध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये अजितदादा यांचा सिंहाचा वाटा होता असा स्पष्ट दावाही सुनिल तटकरे यांनी यावेळी बोलताना केला.

विजय शिवतारे जे बोलत आहेत त्यांचा तो राग आहे. मात्र काही लोकांना बरं वाटतंय. आता ही स्क्रीप्ट कुणाची आहे याचा शोध आम्ही घेत आहोत. मात्र मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे नेते असून ते योग्य ती भूमिका घेतील असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

NCP | अजितदादांचा धडाका; भारत राष्ट्र समितीला दिला दणका; मातब्बर नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

LokSabha Election 2024 | भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ajit Pawar | अजित पवारांना गुर्मी, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली