बिल्किस बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सर्वसामान्यांना दिलासा- शरद पवार

Bilkis Bano Case:- बिल्किस बानोच्या आरोपींना माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारचा होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निकालाचे मी स्वागत करतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)) नी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

शरद पवार  म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालात हा अधिकार महाराष्ट्र सरकारचा असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच गुजरात सरकारने महाराष्ट्र सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप करू न देण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्रित काम कसं करावं यासंबंधीची चर्चा होणार आहे राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रीय महासचिव जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणारे असून त्यासाठी मी आव्हाड्यांना सल्ला दिला आहे की त्यांनी पक्षाच्या हिताची भूमिका मांडावी.

इंडिया आघाडी मधील सर्व घटक पक्ष यांनी एकत्रित आगामी निवडणुकांना सामोरे जावे. यासाठी ही प्राथमिक बैठक असेल यापुढे आणखीनही बैठका होतील. त्यानुसार निर्णय घेण्यासाठी सर्व पक्षातील ज्येष्ठ नेते देखील आगामी बैठकांना उपस्थित राहतील. तर सध्या इंडिया आघाडीमध्ये सर्व पक्षांची एकमेकांशी सुसंगत अशी भूमिका घेण्याची तयारी असल्याचे देखील शरद पवारनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, सध्या जागा कोणा कडे आहे? ती जागा कोणी लढवली तर कुणाला जास्त मत मिळाली या आधारावर जागा वाटप करताना विचार करावा. तसेच जास्त जागा मिळव्यात ही प्रत्येकाची अपेक्षा असते. पण चर्चेतून मार्ग निघेल. काँग्रेसकडे जास्त जागा आहेत. काँग्रेस जास्त जागा जिंकण्याची क्षमता ठेवते. त्यामुळे महाराष्ट्रात ८ ते ९ जागावर लढण्याची चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर इंडिया आघाडीमध्ये वंचित घेण्याबाबत शरद पवार म्हणाले की, वंचितला सोबत घ्यावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.

शरद पवार म्हणाले की, देशातील केंद्र सरकार बदलत नाही, तोवर असे धाडी होत राहणार. विरोधातील पक्षातील नेत्यांवर कारवाई होतच राहणार आहे. आमदार रोहित पवार, आमदार रवींद्र वायकर यांच्या संदर्भातून देखील असेच होत आहे. यापूर्वी देखील महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांविरोधात अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली आहे. सरळ असं दिसतंय की, सत्ताधारी पक्षावर कारवाई होत नाही असे शरद पवार  म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, आम्ही काँग्रेसच्या जयराम रमेश यांच्यासह निवडणूक आयोगाकडे आमच्या बॅलेट पेपरवर प्रश्नांना उत्तरे देण्याची मागणी केली होती. परंतु आयोगाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. आयोगाने १० ते १५ पानांचं पत्र जयराम रमेशांना पाठवलं. त्याचा सार असा आहे की, काहीही बदल करण्याची आवश्यकता नाही जे आहे ते उत्तम आहे निवडणूक आयोगाने उत्तर दिले होते असेही शरद पवार म्हटले.

शरद पवार म्हणाले की, ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे. ते जाऊन भेटतात इथेच संशय निर्माण होतो आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे बाहेर गेले आहेत. अजित पवार आणि त्यांना अशी भूमिका घ्यायला लावणाऱ्यांना पुन्हा पक्षात येऊ दिलं जाणार नाही. याबाबत माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे असेही शरद पवारनी म्हटले आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, अजित पवारांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेबद्दलचा असेल तर, अनेक लोकांची उदाहरणं देता येतील. वयाच्या ८३ व्या वर्षी मोरारजी देसाई पंतप्रधान होते. मोरारजी देसाई हे सुद्धा ज्येष्ठ होते त्यांचं पण वय होतं पण ते काम करत होते. त्यांच्या मागे जनतेचें बहुमत होतं. त्यामुळे अशा वय वगैरे काढण्याच्या गोष्टी काढू नये असे मला स्वतःला वाटत नाही. जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे, तोपर्यंत जनतेची सेवा करणं आणि सहकाऱ्यांना मदत करणं हे माझं काम आहे. त्यामुळे ते मी करत राहील. मी निवडणूक लढणार नाही हे मी जाहीरपणे सांगितलं आहे. राज्यसभेचे माझे एक-दोनच वर्ष राहिली आहेत. ते अर्धवट सोडू का? असा सवाल करत मला माझ्या पक्षाने राज्यसभेत पाठवलं. ते अर्धवट सोडून कसं थांबू? मला लोकांनी संसदेत पाठवलं आहे. त्यामुळे कार्यकाळ असेपर्यंत काम करत राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-

महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

‘धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे, संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत’

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

“येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे”