Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

पुणे : भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे ‘चैतन्यस्पर्श’ हा भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा अभूतपुर्व सोहळा नुकताच पार पडला. यावेळी भव्य भजन स्पर्धा, दिव्यांची आरास, महिला व पुरूषांचे सामुहिक रामरक्षा पठण, ५१ तबला व पखवाज वादकांची जुगलबंदी अशा भक्तीमय कार्यक्रमांमुळे आजुबाजुचा परिसरही प्रसन्न होऊन गेला. यातच राम मंदिराची (Ram Temple) प्रतिकृति आणि अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेल्या मंगल अक्षता कलश याची पूजा भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्या शुभहस्ते झाली. तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale), युवा नेत्या अंकिता पाटिल यांनी देखील पादुकाचं दर्शन घेतले. त्याचबरोबर पादुका दर्शन व महाप्रसादही भाविकांना देण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविधांगी कार्यक्रमाचं बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले. यावेळी बालेवाडी-बाणेर औंध, सुस-म्हाळंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी या परिसरातील शंभरपेक्षा अधिक भजनी मंडळांनी भव्य भजन स्पर्धेत सहभाग नोंदवला. यातच येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पार पडत आहे. त्याच धर्तीवर याठिकाणी श्रीराम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. यावेळी मंदिरात प्रभू श्रीरामाची देखील मुर्ती ठेवण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने लोकांनी श्रीरामाचं दर्शन घेऊन अयोध्येतच आल्याचा आनंद व्यक्त केला. तर यावेळी तब्बल २१ हजार दिव्यांची आरास लावण्यात आली तसेच महिला व पुरूषांचे सामुहिक रामरक्षा पठणही याठिकाणी संपन्न झाले. त्याचबरोबर महिला व पुरुष अशा दोन्ही गटात भव्य भजन स्पर्धाही पार पडली. यावेळी या स्पर्धेत अनेकांनी सहभाग नोंदवला.

‘चैतन्यस्पर्श’ या कार्यक्रमा अंतर्गत भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादूका दर्शनाचा अभूतपूर्व सोहळा पार पडला. यामध्ये प्राचीन श्री दत्त सुवर्ण मुर्ती, श्री दत्त गुरु करूणा पादूका, श्री नृसिंह सरस्वती नारायण पादुका, श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका, श्री साईबाबा पादूका, श्री मच्छिंद्रनाथ महाराज पादुका, श्री समर्थ रामदास स्वामी पादुका, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, श्री शंकर महाराज पादुका, कृष्ण कृपामुर्ती श्रीमद ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. यानंतर भाविकांना महाप्रसादही देण्यात आला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पादूकाचं दर्शन घेतले. यावेळी त्यांनी लहू बालवडकर यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. तसेच येणाऱ्या २२ जानेवारीला लहू बालवडकर संपूर्ण लोकांना अयोध्येत राम लल्लाचं घडवून आणणार असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे महासचिव विक्रांत पाटील, उपाध्यक्ष राजेश पांडे, उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांना यावेळी लहू बालवडकर यांनी राम मंदिराची प्रतिकृतीही भेट दिली.

लहू बालवडकर यांना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, लहू बालवडकर दरवर्षी प्रमाणे भजन स्पर्धा आयोजित करीत आले आहेत. दोन ते तीन दिवस चालणाऱ्या भजन स्पर्धे खूप लांबून लोक येत आहेत. लहू बालवडकर यांची लोकप्रियता इतकी आहे की, त्यांच्या कार्यक्रमाला लोक आवर्जून हजेरी लावतात. अशा भावना यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. तसेच लहू बालवडकर यांची प्रतिमा अशीच वाढत जावो आणि त्याचा कुठेतरी सामाजिक लाभ झाला पाहिजे. असेही चंद्रकांत पाटलांनी म्हटले.

तुषार भोसले म्हणाले की, काही ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने नाचगाण्यांचं कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याठिकाणी पोलीस बळाचा वापर केला जातो. अशा कार्यक्रमातून समाजाला काही मिळत नाही. परंतु लहू बालवडकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अशा पवित्र कार्यक्रम आयोजित केलं की त्यातून समाजाला समाधान मिळेल. समाजाला अध्यात्मिक सुख शांती मिळते. त्यांच्या दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने पादूकांचं दर्शन समाजाला मिळतं. त्यातून समाजाला एक प्रेरणा मिळते अशा भावना यावेळी भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान यावेळी ह.भ.प सोपान महाराज कानेटकर यांचं प्रवर्चन देखील लोकांना ऐकायला मिळालं. तब्बल दोन तास झालेल्या या प्रवर्चंनात सोपान महाराजांनी लोकांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी ते म्हणाले की, आजकालच्या शिकलेल्यांना देवापासून अडचण आहे, रामापासून अडचण आहे. काही लोकांनी रामाच्या मंदिराला विरोध केला. राम मंदिराच्या ठिकाणी शाळा, रूग्णालये बांधण्याची मागणी होतेय. परंतु कोरोनासारख्या महामारीत मंदिर आणि गुरूद्वारांनी लोकांना आसरा दिला. हे विसरता कामा नये. आता प्रत्येक ठिकाणी राम आलाय. आपल्या देशात देवाला स्विकारलं जात नाही. परंतु देवाला स्विकारण्याची नक्कीच वेळ येणार, असेही त्यांनी सांगितले. यानंतर लहू बालवडकर यांच्यासह हजारोंच्या उपस्थितीत महाआरतीही देखील झाली.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ