Supriya Sule | … ‘त्या’ गोष्टी आम्ही सांगू शकत नाही; जाणून घ्या सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या 

Supriya Sule – लोकशाही कडून दडपशाही कडे सध्या जात आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या गॅलरी मध्ये मंत्री आणि आमदारांमध्ये भांडण होतात यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट नाही. मला, शरद पवारांना, रोहित पवारांना त्यांच्या खाजगी आयुष्याशाचा बोलण्याचा अधिकारी नाही कारण आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. पण आमच्या कुटुंबातील लोकांना त्यांचे खाजगी आयुष्य जगण्याचा आणि ते खाजगी ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आमच्या कौटुंबिक वेळेत ज्या काही गोष्टी होतात, त्या नक्कीच आम्ही सांगू शकत नाही. असे सुळे यांनी म्हटले आहे.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक तर मी लोकशाहीत काम करते. मी माझे वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत. माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांसोबत असतात. कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे माझे सगळ्यांची राजकीय आणि वैचारीक मतभेद आहेत. माझे कुणाशीही मनभेद नाहीत. लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. प्रत्येकाची एक स्टाईल आहे. पक्षामध्ये फूट पडलेली नाहीच. शिवाय पवार कुटुंबात तर अजिबात फूट पडलेली नाही असेही सुप्रिया सुळे  म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सुळे म्हणाल्या की, एक तर ही लोकशाही आहे. या लोकशाहीत मी सगळ्यांच्याच संपर्कात आहे. कारण मी लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीचा लोकशाहीमध्ये डायलॉग असलाच पाहिजे. विकासकामे किंवा इतर कामांसाठी चर्चा होतात. यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क झाला नसेल. एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला, तर आपली ओळख तर असली पाहिजे. त्यावेळेस आम्ही हक्काने एकमेकाला मदत करतो. काही गोष्टी माणुसकी म्हणून करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा तर व्हायलाच पाहिजे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान