Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट नाही

Supriya Sule – लोकशाही कडून दडपशाही कडे सध्या जात आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या गॅलरी मध्ये मंत्री आणि आमदारांमध्ये भांडण होतात यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट नाही. मला, शरद पवारांना, रोहित पवारांना त्यांच्या खाजगी आयुष्याशाचा बोलण्याचा अधिकारी नाही कारण आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. पण आमच्या कुटुंबातील लोकांना त्यांचे खाजगी आयुष्य जगण्याचा आणि ते खाजगी ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आमच्या कौटुंबिक वेळेत ज्या काही गोष्टी होतात, त्या नक्कीच आम्ही सांगू शकत नाही. असे सुळे यांनी म्हटले आहे.

सुळे म्हणाल्या की, कोणी कसे वागायचे हा ज्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही लोकशाही आहे, त्यामुळे या लोकशाहीत चर्चा तर झालीच पाहिजे. आपण आपले वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य हे एकत्र करू शकत नाही. तितकी वैचारिक प्रगल्भता ही वयानुसार तरी आलीच पाहिजे असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान