सुप्रिया सुळेच संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहेत – राज ठाकरे

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा आज पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे  सर्वांचे लक्ष होते. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.

ते म्हणाले, शरद पवार नास्तिक आहेत ( Sharad Pawar is an atheist ) असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग फोटो यायला लागले. सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहेत. जिकडे सभा घेतात तिकडे सांगतात राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजे. शरद पवारांनी जे हवं ते न वाचता सगळी पुस्तकं वाचा. मी सर्व वाचलंय. ते सर्व वाचलं तर ते परिस्थितीला धरून आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारं नाही. हिंदू धर्माची ( Hinduism ) पूजा करणारा माणूस होता तो. धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारा व्यक्ती होता. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होता.असं ते म्हणाले.

दरम्यान, या सभेसाठी मनसेचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेत दाखल  झाले होते. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या ( Maharashtra Sanskritik Mandal ) मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. त्याच मैदानावर राज ठाकरे यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग सभा झाली. या सभेला तुफान गर्दी झाल्याचं दिसून आलं.