सुजय विखेपाटील यांना महाराष्ट्राचे राजकारण किती माहित याबाबत शंका…

मुंबई – सुजय विखेपाटील (Sujay Vikhe-Patil) या नव्याने झालेल्या खासदाराने राष्ट्रवादीवर टिका करणे हे जास्तच होत आहे. त्यांना अजून खूप राजकारण पहायचं आहे. त्यांनी जरुर टिका माहिती घेऊन करावी, परंतु शंभर दिवस झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारचे (Shinde-Fadanvis Governmnt) या दिवसातील योगदान महाराष्ट्राला सांगावे असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिले आहे.

खासदार सुजय विखेपाटील यांनी राष्ट्रवादीवर टिका केली असून या टिकेला महेश तपासे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खासदार सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्राचे राजकारण किती माहित आहे याबाबत शंका आहे असा टोलाही महेश तपासे यांनी यावेळी लगावला.

राष्ट्रवादीने व पवारसाहेबांनी नेहमी महाराष्ट्र घडवला आहे शेतकरी, कास्तकरी घडवले आहेत शिवाय शिक्षक, विद्यार्थी, मजुर, व्यावसायिक यांना मार्गदर्शन केले आहे त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.