पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी सिंबबायोसिस आश्वासक पाऊल उचणार – डॉ. विद्या येरवडेकर

Symbiosis International University : हवामान, पर्यावरण याच्याशी संबंधित आपल्याकडे शास्त्रोक्त आणि कायद्याच्या परिभाषेतील अभ्यासक्रमाची कमतरता आहे. भविष्यामध्ये या विषयावर आधारित अभ्यासक्रम सुरु करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मत असे मत सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी व्यक्त केले आहे.

इरास्मस च्या ४ थ्या आंतरराष्ट्रीय बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी सीबीएचई परियोजना जलवायु परिवर्तन नीती आणि कायदा (सीसीपी कायदा) बाबत पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या की, सध्याच्या घडीला ‘क्लायमेट चेंज’ (पर्यावरण बदल) ही एक जागतिक समस्या झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी सिंबबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातून आपण विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. जगभरातून ‘क्लायमेंट चेंज अँड पॉलिसी’ विषयावर अनेकजण अभ्यास करत आहेत. त्यात सिंबबायोसिस अभिमत विद्यापीठाचा मोठा वाटा आहे.

आता या चर्चासत्रामध्ये केवळ भारतच नाहीतर मलेशिया, सिंगापूर, युके सारख्या विविध देशांमधून मान्यवर सहभागी झाले आहेत. खरं तर आपल्याकडे क्लायमेट चेंज अँड पॉलिसी सारख्या विषयावर अभ्यासक्रम किंवा त्याच्याशी संबंधित आणखी काही सर्टिफिकेट कोर्सेस दिसत नाही. सिंबबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या वतीनं येत्या काळात क्लायमेट चेंज आणि लॉ याच्याशी संबंधित एलएलएम किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी एखादा अभ्यासक्रम सुरु करता येईल का, याविषयी विचार करत आहोत. या परिषदेमध्ये त्यावर चर्चाही केली जाणार असल्याचे डॉ. येरवडेकर यांनी सांगितले.

हवामान, पर्यावरण आणि त्याच्याशी संबंधित कायदे या विषयावर स्वतंत्र असा कोर्स सध्या नाही. तो कसा तयार करता येईल यावर लक्ष केंद्रित केला जाणार आहे हे सांगताना डॉ. येरवडेकर म्हणाल्या की, भविष्यात सिंबबायोसिस हे स्पेसिफिक ‘क्लायमेट चेंज अँड लॉ’ यावर आधारित एलएलएम आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम सुरु करणार आहोत.

सिंबबोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे नेहमीच क्लायमेट चेंज (पर्यावरण बदल) यावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करण्यासाठी सक्रिय राहिले आहे. त्याच्याशी विविध घडामोडींशी संबंधित प्रोजेक्ट सादर करण्यावर आम्ही भर दिला आहे. आम्ही पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी एका सेंटरची निर्मिती देखील केली आहे. त्यातून पर्यावरण विषय प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. असेही डॉ. येरवडेकर यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी सिंबबायोसिस लॉ स्कूलच्या संचालिका आणि सिंबबायोसिस लॉ युनिव्हर्सिटीच्या प्रमुख (डीन) डॉ. शशिकला गुरपूर म्हणाल्या की, आम्हाला Transnational Project Meeting of the Erasmus+ CBHE Project Climate Change Policy ( सीबीएचई) हा प्रोजेक्ट साधारण दोन वर्षांपूर्वी मिळाला होता. मात्र त्यावेळी सगळीकडे कोव्हिडची मोठ्या प्रमाणात साथ होती. या प्रोजेक्टसाठी जगभरातील २०० हून अधिक विद्यापीठांनी अर्ज केले होते. त्यात सिंबबायोसिस लॉ अभिमत विद्यापीठाची निवड झाली ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही युरोप आणि आशिया मधील क्लायमेट चेंज, लॉ अँड पॉलिसी (हवामान बदल, त्याच्याशी संबंधित कायदे आणि धोरणे) यावर आधारित अभ्यासक्रम तयार करणार आहोत. तो भविष्यात एलएलएम किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आम्हाला या प्रोजेक्टमध्ये २ एशियन, २ व्हिएतनाम तसेच २ मारवाडी युनिव्हर्सिटीचे मान्यवर अभ्यासक सहाय्य करणार आहेत. यापूर्वी आम्ही २०२१ मध्ये या अभ्यासक्रमाशी संबंधित एक अहवाल तयार केला होता.

त्या अहवालाची आणि युरोपियन अहवालासोबत तुलना केली असता काही गोष्टी दिसून आल्या जसं की, आपल्या देशात फक्त क्लायमेट चेंज या विषयावर एकसंध असा कायदा दिसून येत नाही. पर्यावरण विषयक जे कायदे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. अशा प्रकारे यासर्व गोष्टी एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न या प्रोजेक्टच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे डॉ. गुरपूर यांनी यावेळी सांगितले.

सिंबायोसिस लॉ स्कूल पुणे (अभिमत विद्यापीठ) यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही बैठक १६ सप्टेंबर पर्यत सुरु राहणार आहे. त्यामध्ये जगभरातील विविध देशांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.  या महत्वकांक्षी बैठकांसाठी सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे च्या वतीनं वेगवेगळ्या सहा देशांतून ३० ते ३५ मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात युनाटेड किंग्डम युनिव्हर्सिटी, गिरोना युनिव्हर्सिटी, युरोपियन युनिव्हर्सिटी, मलेशिया, आंतरराष्ट्रीय इस्लामिक युनिव्हर्सिटी, ह्यु युनिव्हर्सिटी, यांचा समावेश आहे. याबरोबरच भारतातील मारवाडी युनिव्हर्सिटी देखील या बैठकीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.

https://youtube.com/shorts/Ju1y8hb1NHI?si=0qtW1pIMZiZwogoI

महत्वाच्या बातम्या-
कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा; धनंजय मुंडेंचे निर्देश
फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ, चित्रा वाघ यांचा इशारा