‘मला सर्वांना अलविदा करायचा आहे’ म्हणत ‘तारक मेहता…’ फेम मराठमोळ्या अभिनेत्यानं घेतला अखेरचा श्वास

Mumbai: तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) फेम सुनील होळकर (Sunil Holkar) यांचे निधन झाले. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन केले, पण आता ते आपल्यात नाहीत. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सुनील यांना यकृताचा सोरायसिस होता, ज्यापासून ते बऱ्याच काळापासून ग्रस्त होते. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचारही सुरू होते. मात्र अखेर त्यांनी १३ जानेवारी रोजी शेवटचा श्वास (Sunil Holkar Death) घेतला. ‘झी हिंदुस्थान’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता सुनील यांना त्यांच्या मृत्यूची आदीच जाणीव झाली होती. या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या मित्राला इको मेसेजही केला होता. ते म्हणाले होते की, त्यांना सर्वांना अलविदा करायचे आहे. तसेच लोकांच्या प्रेमाबद्दल आभारी असल्याचे सांगितले. सुनील होळकर यांनी त्या मेसेजमध्ये आपण केलेल्या चुकांची माफीही मागितली होती.

सुनील होळकर यांनी ‘गोष्ट एका पैठणीची’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातही काम केले होते. तारक मेहता का उल्टा चष्मामध्येही ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवत होते. इतकंच नाही तर ‘सष्ठ पैठणी’ या चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं.