कोण आदित्य ठाकरे..? तो केवळ एक आमदार आहे; ताजनी सावंतांची तुफान फटकेबाजी

पुणे – आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे पुणे दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या बाजूला आ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या घराशेजारी आ. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे देखील शक्तीप्रदर्शन होत आहे. मात्र, त्याने काही फरक पडणार नाही. सर्व शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. तर कोण आदित्य ठाकरे? तो एक आमदार असल्याचे म्हणत सावंतांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

आता सर्व शक्ती निघून गेल्यावर शक्तीप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी कार्यालयाची तोडफोड केली त्यांनीही आवकातीमध्ये रहावं… कुणाशी पंगा घेताय हे डोक्यात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिला आहे. सर्व शिवसैनिक हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे आता काही फरक पडणार नाही. आणि ते आहेत तरी कोण? एका आमदाराशिवाय आता त्यांच्याकडे कोणते पद आहे अशी टिकाही सावंत यांनी केली.