सेमीफायनलपूर्वी संघाला मोठा धक्का! हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कर्णधार सामन्यातून बाहेर

Temba Bavuma Injury: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात १७ नोव्हेंबर रोजी वनडे विश्वचषकाचा उपांत्य सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला असून कर्णधार तेंबा बावूमाला (Temba Bavuma) हॅमस्ट्रिंग (मांडीचा स्नायू) दुखापत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मुकण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना नऊ चेंडूंचा खेळ झाल्यावर बावूमा ड्रेसिंग रूममध्ये लंगडत परतला होता. चार षटकांनंतर तो पुन्हा मैदानात आला; परंतु मिडऑफलाच त्याने क्षेत्ररक्षण केले. फलंदाजी करताना एकेरी धावा पळताना त्याला त्रास होत असल्याचे दिसून येत होते.

माझा पाय दुखत होता. ही दुखापत नेमकी किती गंभीर आहे हे माहिती नाही, उपांत्य फेरीपर्यंत मी तंदुरुस्त होईन अशी आशा आहे, असे बावूमाने सांगितले. दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी होणार आहे. त्यामुळे बावूमाकडे विश्रांतीसाठी पाच दिवसांचा कालावधी आहे.