वीर सावरकरांचा फ्लेक्स काढून टाकल्याने तणाव; ‘या’ शहरात कलम १४४ लागू

शिवमोग्गा – एका बाजूला आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना कर्नाटकमधून एक अतिशय संतापजनक अशी बातमी समोर आली आहे. या राज्यातील शिवमोग्गा शहरातील अमीर अहमद सर्कल येथे लावलेला वीर सावरकर यांचा फ्लेक्स काही युवकांनी काढून टाकल्याची Veer Savarkar Flex vacated घटना आज घडली आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून फ्लेक्स काढून त्याची विटंबना करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी शहरात कलम 144 लागू करण्यात आले (Section 144 enforced in Shivamogga) आहे.अमीर अहमद सर्कलमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. शहरातील गांधी बाजार आणि नेहरू रोडवरील दुकाने बंद ठेवण्यात आली असून संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.ETV ने याबाबत वृत्त दिले आहे.