सलाम देशभक्तीला : रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात सामील होण्यासाठी पोहोचला 80 वर्षीय वृद्ध

कीव – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी, २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर लष्करी हल्ले करण्याची घोषणा केल्यापासून रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. त्याचवेळी, सध्या सोशल मीडियावर युक्रेनमधील नागरिकांचे अनेक धक्कादायक फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे, ज्याने सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत.

युक्रेनमध्ये युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या सैनिकांची संख्या ही चिंतेची बाब असताना रशिया विरोधात लढण्यासाठी देशातील अनेक नागरिक बाहेर पडत आहेत आणि सैन्यात भरती होत आहेत. ते देशासाठी लढण्याबद्दल बोलत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की 80 वर्षीय व्यक्तीला रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनच्या सैन्यात सामील व्हायचे आहे.

कॅटरिना युश्चेन्कोने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती युक्रेनच्या सैन्यात सामील होण्यासाठी रांगेत उभा असलेला दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टला यूजर्सचा वेगवान प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर या फोटोला झपाट्याने 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर यूजर्स सतत या शूर माणसाच्या देशावरील प्रेमाचे कौतुक करताना दिसत आहेत. यासोबतच मोठ्या संख्येने वापरकर्ते त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट करून युक्रेन आणि तेथील लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहेत.