रडतोय काय लका, आपल्याला पुढं जाऊन जिंकायचं, रडू नकोस, 35 % वाल्या लेकास बापाने दिला धीर

Pune – काल 17 जून रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर राज्यातील अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण दिसून आले. त्यातच पुण्यातील एका विद्यार्थ्याने सर्व विषयात 35 गुण मिळवले आहेत. शुभम जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, शुभमची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होताच, तेथील नागरिकांनी पुणेरी पगडी आणि पेढे देऊन शुभमचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, शुभम हा एका होतकरू कुटुंबातील विद्यार्थी आहे. तो न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग या शाळेत शिकत आहे. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबात त्याने हे यश मिळवून दाखवले आहे. शुभम दिवसभर हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. त्यानंतर सायंकाळी घरी येऊन तो दहावीचा अभ्यास करत असे. असं त्याच्या वडिलांनी सांगितले.

मुलाला ३५ टक्के गुण पडल्याचे थोडसं वाईट वाटलं. पण, त्याने दुकानात काम करुन त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. मला त्याचा अभिमानही वाटतो. कारण, तो पास होतो की नाही, याचीही मला चिंता होती. मात्र, यापुढे त्याने चांगले मार्क्स मिळवून उत्तीर्ण व्हावं अशी अपेक्षाही त्याचे वडिल राहुल जाधव यांनी व्यक्त केली.

यावेळी, शुभमला रडू कोसळलं, तेव्हा अरे लेका रडतोय काय, आपल्याला अजून पुढं जिंकायचंय, रडू नकोस… असे म्हणत शुभमच्या वडिलांनी पोराला धीर दिला. वडिलकीच्या नात्याने मी त्याच्या पाठिशी आहे, मी त्याला सर्व ते सहकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले.लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.