Budget 2024 | २०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्यासाठी आमचं सरकार काम करत आहे

Budget 2024 Live Updates, Finance Minister Nirmala Sitharaman Speech: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा आजचा मोदी सरकारचा (Modi Govt) शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत.

आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, २०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्यासाठी आमचं सरकार काम करत आहे.उच्च शिक्षणात महिलांचा समावेश १० वर्षांत २८ टक्क्यांनी वाढला आहे. एसटीईएम अभ्यासक्रमांमध्ये मुली व महिलांचा सहभाग ४३ टक्के आहे. 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे रोख रक्कम थेट करोडो शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जात आहे.

देशातील अन्नदाता या योजनेचा लाभ घेत असून 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम फसल योजनेचा लाभ दिला जात आहे. आम्ही 300 विद्यापीठे स्थापन केली आहेत आणि एक तृतीयांश महिलांना आरक्षण दिले आहे. 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीची जोरदार मोर्चेबांधणी; मेळाव्यांचा लावला धडाका

महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

‘प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार’