सरकारचा दहशतवादावर प्रहार! NIA मध्ये 7 नवीन उच्चस्तरीय पदे निर्माण केली जाणार

NIA – केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये (NIA) उच्च स्तरावर सात पदे निर्माण करण्यास परवानगी दिली. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले की, गृह मंत्रालयाने एक अतिरिक्त महासंचालक (ADG) आणि सहा महानिरीक्षक (IG) हे पद निर्माण करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भातील आदेश सोमवारी जारी करण्यात आला आहे.

सध्या एनआयएमध्ये एक एडीजी आणि चार आयजी आहेत. त्यांचे काम खलिस्तान आणि इस्लामिक दहशतवाद, वामपंथी अतिरेकी, सीमापार भारतविरोधी कारवाया, सायबर दहशतवाद, संशोधन, बनावट चलनाशी संबंधित बाबी, (Matters related to Khalistan and Islamic Terrorism, Left Wing Extremism, Cross Border Anti-India Operations, Cyber Terrorism, Research, Counterfeit Currency)गुप्तचर तसेच धोरणविषयक बाबींवर लक्ष ठेवणे हे आहे. गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर एनआयएमध्ये दोन एडीजी आणि 10 आयजी असतील, जे प्रामुख्याने दहशतवादाविरोधात कारवाई करतील.

सरकार नवीन पद का तयार करत आहे?

खरे तर, वरच्या स्तरावर राष्ट्रीय तपास यंत्रणा मजबूत करण्याची मागणी सातत्याने होत आहे. याचे कारण म्हणजे आयजी, उपमहानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांच्या स्तरावर अनेक प्रकरणांचा बोजा आहे. यामुळे आता अधिक पदे निर्माण झाल्यास कामाचे विभाजन होऊन अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल, असे सरकारला वाटत आहे. त्यामुळेच आता या पदांना शासनाने मान्यता दिली आहे.

‘पत्रकारांचा अवमान करणा-या चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपने राज्यातील पत्रकारांची माफी मागावी’

गृह मंत्रालयाकडून एक एडीजी आणि सहा आयजींच्या मान्यतेनंतर या कामाचे वाटप केले जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. याद्वारे दहशतवादाच्या नव्या धोक्यांना तोंड देता येईल आणि त्यावर काम करता येईल. एबीपी न्यूज ने याबाबत वृत्त दिले आहे.

NIA ची स्थापना 2009 मध्ये झाली

2008 मध्ये मुंबई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने 2009 मध्ये दहशतवादविरोधी एजन्सी तयार केली. एनआयएने आतापर्यंत ५१० प्रकरणे नोंदवली असून त्यापैकी ९४ टक्के आरोपींना शिक्षा झाली आहे. गेल्या वर्षी या एजन्सीने देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तसेच परदेशातील खलिस्तानी आणि गुंडांच्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला