कसब्यात अनेक दिग्गज शर्यतीत असतानाही उमेदवारी मिळवणारे हेमंत रासने नेमके कोण आहेत ?

Pune Bypoll Election : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असताना विरोधकांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे.

यातच आता भाजपने देखील एक पाऊल पुढे टाकत आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली असून चिंचवडसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.(Ashwini Laxman Jagtap for Chinchwad and Hemant Rasane for Kasba Peth announced).

दरम्यान, उमेदवारी घोषित झाल्यानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणूक विक्रमी मतांनी भाजप जिंकणार, असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक लढवली जाईल, असे रासने म्हणाले.कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला केली होती. भाजप ही निवडणूक जिंकण्यास सक्षम आहे, असे रासने यांनी सांगितले.

हेमंत नारायण रासने कोण आहेत ? 
* सन 2002, 2012, 2017 पुणे महापालिकेत नगरसेवक
* सन 2019-20 ते 2021-22 सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद
* अध्यक्ष, सुवर्णयुग सहकारी बँक लिमिटेड
* उत्सव प्रमुख, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती स्ट
* सरचिटणीस, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

महत्त्वाची विकासकामे

* स्थायी समिती अध्यक्ष असताना महसूली उत्पन्नात विक्रमी वाढ
* पुण्यदशम – शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर एसी बसमधून प्रवास
* मंडईत भुयारी मेट्रो
* समान पाणीपुरवठा – 24 तास, शुद्ध, पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा
* भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय
* शहराच्या मध्यवर्ती भागांतील पावसाळी गटारे, सांडपाणी करणाऱ्या जलवाहिन्या तब्बल 45 वर्षांनी बदलून घेतल्या.
* मध्यवर्ती भागांतील रस्त्यांची निर्मिती
* कसबा मतदार संघातील विविध भागांत सिग्नल सिंक्रानाझेशन आणि सीसीटीव्ही यंत्रणा
* नदीकाठ सुधारणा, नदी शुद्धीकरण प्रकल्पांना गती

महत्त्वाचे उपक्रम

* साडेपाच हजारांहून अधिक रक्त बाटल्यांचे दरवर्षी संकलन
* कर्तुत्ववान महिलांचा यथोचित सन्मान
* कोरोनाचे घरोघरी जाऊन विक्रमी लसीकरण
* कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य
* कोरोना योद्धा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सन्मान