दोन रुपयांची दर कपात करुन फार मोठी कपात केल्याचा आभास केंद्रसरकारकडून निर्माण केला जातोय – भुजबळ

मुंबई – केंद्र सरकार वारंवार इंधनाचे दर वाढवत असून राज्यांना जीएसटीचा परतावा देत नाही.२५ रुपयांची वाढ करुन त्यानंतर दोन रुपयांची दर कपात करुन फार मोठी कपात केल्याचा आभास केंद्रसरकारकडून निर्माण केला जातोय अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन छगन भुजबळ यांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला.

किरीट सोमय्या यांच्यावर जो हल्ला झाला त्याबाबतही पत्रकारांनी प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी रक्तस्त्राव झालेला नाही असे मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटले आहे तर त्यांच्या तोंडावर रक्त आले कुठून ? दुसऱ्या दिवशी ते पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यावर बँडेच नव्हते, तिथे जखम नव्हती, हे कसे काय झाले? असे प्रश्न उपस्थित करुन किरीट सोमय्या यांच्या नौटंकीची पोलखोल केली.