मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा; मनसेचे शिवसेनेवर टीका

मुंबई – सर्वपक्षांनी मिळून मला राज्यसभेवर निवडून द्यावं, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी  केले होते. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने मंगळवारी आपला उमेदवार जाहीर केला. त्यांच्याकडून कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुढील काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरावर चाल करुन जाणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना मनसेचे नेते गजानन काळे  यांनी केलेले एक ट्वीट मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे.

गजानन काळे यांनीदेखील ट्वीट करत राजेंचा मान सन्मान कसा ठेवायचा हे आम्हास ठाऊक असल्याचं सांगितलं आहे. मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. बाकी नाव छत्रपतींचे घ्यायचे आणि छत्रपतींच्या वंशजाच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही सेना आणि महाविकास आघाडीची निती असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.