हद्द झाली! … म्हणून ‘या’ व्यक्तीने चक्क स्वतःच्या बहिणीशी लग्न केले

फिरोजाबाद – फिरोजाबाद येथील एका व्यक्तीने सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी या व्यक्तीने चुलत बहिणीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून या नवदांपत्याविरोधात आता गुन्हा देखील दाखल झाला आहे.

11 डिसेंबर रोजी फिरोजाबादच्या तुंडला येथे सामूहिक विवाहाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला राज्य सरकारकडून घरगुती साहित्य आणि रोख रक्कम दिली जाते. 20 हजार रुपये थेट वधूच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. याशिवाय लग्नाचा संपूर्ण खर्च आणि 10 हजार रुपये भेटवस्तू सरकार देते. 20 हजार रुपये आणि भेटवस्तूंच्या लालसेपोटी या व्यक्तीने चुलत बहिणीशी लग्न केले असल्याचे समोर आले आहे.

Aaj Takच्या रिपोर्टनुसार, तुंडला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये इतर 51 जोडप्यांचाही विवाह झाला. विशेष म्हणजे हा व्यक्ती आधीच विवाहित आहे आणि त्याला दोन मुले आहेत. मात्र या नुकत्याच पार पडलेल्या विवाहानंतर स्थानिक लोकांनी या दोघांचा डाव ओळखल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुली आणि ही फसवणूक उघडकीस आली.

जिल्हा प्रशासन सामूहिक विवाहासाठी जोडप्यांची योग्य पद्धतीने निवड करते. आधार कार्ड, मतदार कार्ड, बँक पासबुक यांची कसून तपासणी केली जाते. या जोडप्याची पडताळणीही ग्रामपंचायत मरसेनामध्ये करण्यात आली. मात्र असे असतानाही लग्न पार पडले. ही बाब समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला आहे.

तुंडला गट विकास अधिकारी नरेश कुमार यांनी सांगितले की, संबंधितांवर कारवाई केली जाईल. विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या आधार कार्डची पडताळणी केली जात आहे. आता सर्व 51 नवविवाहित जोडप्यांचीही पुनर्तपासणी केली जात आहे.

कायदा काय म्हणतो?

हिंदू विवाह कायद्याच्या कलम 5 नुसार भाऊ-बहीण, काका-भाची, मावशी-पुतणी किंवा भाऊ-बहिणीची मुले किंवा दोन भाऊ किंवा दोन बहिणी यांचा विवाह प्रतिबंधित आहे. जोपर्यंत संबंधित समाजाची प्रथा परवानगी देत नाही तोपर्यंत विवाहाला काही अर्थ नाही. याशिवाय विवाहित व्यक्ती दुसऱ्याशी लग्न करू शकत नाही. असा विवाह अवैध मानला जाईल.