कोरोना वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स आहे – मेधा पाटकर

पुणे – समाजसेविका मेधा पाटकर यांनी खळबळजनक विधान केले आहे. मेधा पाटकर यांनी म्हटले आहे की ज्या वुहान लॅबमधून कोरोनाचा उत्पत्ती झाल्याचा दावा केला जात आहे त्या वुहानमधील प्रयोगशाळेचे मालक बिल गेट्स आहेत .

मेधा पाटकर यांचा दावा आहे की चीनची वुहान प्रयोगशाळा बिल गेट्स फाऊंडेशनच्या मालकीची आहे. एवढेच नव्हे तर, बिल गेट्स यांच्या फाऊंडेशनने संपूर्ण जगातील शेतीवर (Farm Land) डल्ला मारण्याचा डाव आखला असल्याचे सांगत, गेट्स स्वतः 2 लाख 40 हजार एकरचे मालक असल्याचे पाटकर म्हणाल्या.

पुण्यात बोलताना त्या म्हणाल्या, बिल गेट्स फाऊंडेशनने पूर्ण जगाच्या शेतीवर कब्जा करण्याचं ठरवलं आहे. स्वतः अमेरिकेतल्या दोन लाख ४० हजार एकराचा मालक असून सुद्धा आणि त्यांना आता केंद्रातले कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी आंदोलनालासुद्धा दाद न दिल्यामुळे ७१५ शेतकरी शहीद झाले आहेत. त्या तोमरांनी गेट्स यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. तेव्हा हे कॉर्पोरेटायझेशन याला जबाबदार आहे.