फेब्रुवारीत लग्न, सप्टेंबरमध्ये स्वरा झाली आई; बाळाचे फोटो फहाद अहमदच्या कुटुंबासह केले शेअर 

Swara Bhaskar: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar Baby) नुकतीच आई झाली आहे. अभिनेत्रीने 23 सप्टेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी स्वराने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मुलीसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते आणि आपल्या मुलीचे नावही सांगितले होते. आता स्वरा यांची मुलगी सहा दिवसांची आहे. अशा परिस्थितीत स्वराने आणखी काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

इंस्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनमध्ये, स्वराने तिच्या छठीदरम्यान तिच्या मुलीचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये पहिल्या फोटोमध्ये स्वरा आणि फहाद आपल्या मुलीला आपल्या मांडीवर घेऊन त्यांच्याकडे प्रेमाने पाहत असल्याचे दिसून येते. दुस-या आणि तिसर्‍या फोटोत त्यांचे दोन्ही कुटुंब राबियाचे लाड करताना दिसत आहेत.

याआधी स्वराने एक पोस्ट शेअर करून तिच्या मुलीचे नाव सांगितले होते. स्वरा आणि तिचा फहाद अहमद (Swara Bhaskar Husband) यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया (Swara Bhaskar Baby Girl) ठेवले आहे. अभिनेत्रीने आपल्या मुलीचे नाव एका सुफी संताच्या नावावर ठेवले आहे. राबिया बसरी इराकमधील एक सुफी संत होत्या, ज्यांना इराकची पहिली महिला सुफी संत मानले जाते.

उल्लेखनीय आहे की स्वराने 16 फेब्रुवारी 2023 रोजी समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत तिचे लग्न रजिस्टर केले होते. त्यानंतर मार्चमध्ये त्यांचे लग्न झाले, ज्यामध्ये संगीत आणि कव्वाली रात्रीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनही दिल्ली आणि मुंबईत पार पडले, ज्यात अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या.

https://youtu.be/V2CJh5NTALo?si=2M0cjG7pZl00qALS

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण