संधी मिळताच सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांना ‘मामा’ बनविले ? 

अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाच नाही. तर ज्यांची भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, त्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे. (Why did Satyajit Tambe file as an independent?)

दुसरीकडे भाजपचा अधिकृत उमेदवारच दिला नाही. आता तांबे यांनी आपण काँग्रेसचाच उमेदवार असल्याचा आणि सर्वपक्षांना बिनविरोधसाठी आवाहन करणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे सत्यजीत भाजपचे उमेदवार असतील तर आम्हाला चालतील, असे महसूलमंत्री तथा भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (BJP leader Radhakrishna Vikhe Patil)) यांनी आधीच म्हटले आहे.

यातच आता बाळासाहेब थोरात यांनी भाचा सत्यजित तांबे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मुरड घातल्यानेच  हे महाभारत घडत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान थोरात यांनी आपल्या कन्येला राजकीय वारस म्हणून पुढे आणल्याने सत्यजित अस्वस्थ होते. संधी मिळताच सत्यजित तांबे यांनी थोरात यांना ‘मामा’ बनविले.अशी चर्चा आहे.