‘मराठा आणि ओबीसीमध्ये वाद नाही, मात्र काही लोक असे वातावरण निर्माण करत आहेत’

Sharad Pawar: नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचे प्रमाणपत्र (Sharad Pawar Caste Certificate) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शरद पवार हे ओबीसी प्रवर्गातील असल्याचे म्हटले आहे. हे कागदपत्र त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी खोटे ठरवले होते. यावर आता खुद्द शरद पवार यांचीच प्रतिक्रिया समोर आली आहे. मला जन्माने दिलेली जात मी लपवत नाही, माझी जात काय आहे हे साऱ्या जगाला माहीत आहे, असे शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) बोलताना शरद पवार यांनीही मराठा तरुणांच्या भावना तीव्र आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असंही म्हटलं आहे. गोविंद बागेत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ही माहिती दिली. सोबतच मराठा तरुणांची भावना तीव्र आहे. मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणार नाही, जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करू, अशी ग्वाहीही शरद पवार यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसीमध्ये वाद नाही, मात्र काही लोक असे वातावरण निर्माण करत आहेत. लोकांच्या न्यायाशी निगडीत प्रश्न सोडवले पाहिजेत, असे शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीला राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते होते. आरक्षणाच्या पुर्ततेची प्रक्रिया पुर्ण करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले असल्याचंही शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत