Shreyas Talpade suffers heart attack : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आलीये. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी झाल्याचं समोर आलं आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तळपदे पूर्णपणे बरा होता आणि त्याने अंडरप्रॉडक्शन मल्टीस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’साठी संपूर्ण दिवस शूट केले. “=त्याने दिवसभर चित्रीकरण केले, तो पूर्णपणे ठीक होता आणि सेटवर सगळ्यांशी हसून बोलत होता. त्याने थोडेसे अॅक्शन सीक्वेन्सही शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले पण तो वाटेतच कोसळला.
सध्या अँजिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, श्रेयस तळपदे या मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला नावाजलेला अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. दरम्यान श्रेयसच्या प्रकृतीबाबतच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा;अशोक चव्हाण यांची मागणी
Barbeque Chicken Salad तुमच्या तोंडाला आणेल पाणी! रेसिपी नोट करुन घ्या
सरकारने प्रत्येक मोर्चाला तोंड दिले पाहिजे, कोणी ना कोणीतरी मंत्र्यांनी सामोरे जायला हवे – पाटील
आरक्षणाच्या वादावर एकच पर्याय असलेली जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात करा – नाना पटोले