संजय राऊतांना धमकीचा फोन; नवनीत राणांची प्रतिक्रिया,काळजीने त्या म्हणाल्या,…

मुंबई –  खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धमकीचे फोन (Threats Calls) आल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन (Death Threats Calls) आले. फोनवरून राऊतांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats to Sanjay Raut Calls) दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका (Kannada Rakshana Vedika) संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “कन्नड वेदिका संघटनेने महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली. हा माझ्यावरील हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरील हल्ला असेल. यावर भाजपा काही बोलणार आहे का की थंडपणे पाहणार आहे? शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडल्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू सांगतात यावर भाजपाने बोलावं.”असं राऊत म्हणाले आहेत.

यावर अपक्ष खासदार नवनवीत राणा यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, धमकी कुणाला येत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. लोकप्रतिनिधीला थेट करत असेल तर त्याची चौकशी अधिक गांभीर्याने घेतली पाहिजे. राऊत यांच्या वक्तव्यामागे नेहमी काही ना काही अजेंडा असतो. यावेळीही असेल. त्यामुळे या फोन कॉलची खरोखरच चौकशी झाली पाहिजे, असे नवनीत राणा म्हणाल्या.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर मनसेचे नेते गजानन काळे यांनी भाष्य केले आहे. सौ दाऊद ज्यांना घाबरतात त्यांना धमकी आल्याच कळतंय..काळजी नका करू सरकार संरक्षण देईलच पण जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना महाराष्ट्रसैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील. मात्र चर्चेत राहण्यासाठी अश्या काड्या पिकवू नका. खरंच यांना धमकी आली का पहावे सरकारने.असं काळे यांनी म्हटले आहे.