टिपू सुलतान चार वेळा इंग्रजांविरुद्ध लढले, सावरकरांनी चार वेळा माफी मागितली – ओवेसी

हैद्राबाद – वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रसिद्ध असणारे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे पुन्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. टिपू सुलतान यांनी चार वेळा इंग्रजांशी लढाई केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चार वेळा इंग्रजांची माफी मागितली, असे ओवैसी म्हणाले आहेत.

“टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात युद्ध केले होते. आपल्याला ते विसरता येणार नाही. आज टिपू सलतान यांच्याविरोधात खोटी माहिती दिली जात आहे. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात चार युद्ध केली. तर दुसरीकडे सावरकरांनी इंग्रजांना चार वेळा माफीचे पत्र लिहिले. आज असे काही लोक आहेत, जे टिपू सुलतान यांच्याविरोधात रोष पसवरण्याचे काम करत आहेत. टिपू सुलतान यांनी दिलेल्या योगदानाला ते मिटवू पाहात आहेत,” असे ओवैसी म्हणाले.

“टिपू सुलतान यांना हिंदूविरोधी म्हटले जाते. मात्र ज्या मुस्लिमांनी ब्रिटिशांची गुलामी स्वीकारली होती, त्यांचादेखील टिपू सुलतान विरोध करायचे. ज्या मराठा शासकांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, त्यांच्याविरोधातही टिपू सुलतान होते. कर्नाटकच्या नवाबने इंग्रजांविरोधात लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे टिपू सुलतान यांनी नवाबाचाही विरोध केला होता,” असेदेखील ओवैसी म्हणाले.