लग्न करावं तर फक्त २२ डिसेंबरला! हनीमूनसाठी होईल फायदाच फायदा, जाणून घ्या सविस्तर

दिवाळी संपताच लग्नाचा हंगाम येतो आणि शुभ मुहूर्त पाहून लोक लग्नाच्या तयारीला लागतात. परंतु अशा लोकांना ज्यांना त्यांच्या लग्नाची पहिली रात्र नेहमीसाठी अविस्मरणीय बनवायची आहे, त्यांनी 22 डिसेंबर रोजी लग्न करावे! आता तुम्ही म्हणाल, या दिवशीचा मुहूर्त लग्नासाठी सर्वात शुभ असतो का? तर नाही. या दिवशी लग्न करण्यामागे एक वेगळेच कारण आहे. 

आज 22 डिसेंबर… वर्षातील सर्वात लहान दिवस. म्हणजेच वर्षातील सर्वात मोठी रात्रही याच दिवशी असते. या दिवशी सूर्यप्रकाश फक्त 10 तास 41 मिनिटे राहील. वर्षातील चार दिवस सर्वात महत्त्वाचे आहेत. 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आहे, तर 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे. त्याचप्रमाणे, 21 मार्च आणि 23 सप्टेंबर हे वर्षातील दोन दिवस आहेत जेव्हा दिवस आणि रात्रीचा कालावधी समान असतो. परंतु हे फक्त या तारखांना उत्तर गोलार्धात घडते.

या वर्षातील सर्वात लहान दिवस आज (22 डिसेंबर) आहे. याचे कारण खगोलशास्त्रीय घटना आहेत. आजचा दिवस 10 तास 41 मिनिटांचा आणि रात्र 13 तास 19 मिनिटांची असेल. तरीही प्रकाश आणि अंधाराची वेळ तुमच्या स्थानावर अवलंबून असते. 22 डिसेंबर 2022 रोजी, सूर्याभोवती पृथ्वीच्या क्रांतीच्या वेळी सूर्य मकर राशीवर उभा असेल. मकर राशीवर उभ्या असल्याने, दक्षिण गोलार्धात दिवस मोठे आणि उत्तर गोलार्धात लहान असतील.

याचा परिणाम पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र होईल. मध्य भारताबद्दल बोलायचे झाले तर तिथे सूर्योदय सकाळी 7.05 वाजता होईल आणि संध्याकाळी 5.46 मिनिटांनी सूर्यास्त होईल. म्हणजेच दिवसाची वेळ 10 तास 41 मिनिटे आणि रात्र 13 तास 19 मिनिटे असेल. थोडक्यात 22 डिसेंबर रोजी दिवस छोटा आणि रात्र मोठी असल्याने नवविवाहीत जोडप्याला मधुचंद्रासाठी अधिकचा कालावधी मिळतो.