आज देशच नाही तर संपूर्ण विश्वभरातील नागरिक काश्मिरी हिंदूंसोबत आहेत – महेश लांडगे 

पुणे – दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. २ आठवड्यात ह्या चित्रपटाने १७९ करोड कमावले आहेत. देशभरात या चित्रपटाने खळबळ  उडवून दिली असून या चित्रपटाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातच आमदार महेश लांडगे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महेश लांडगे आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणाले, हा काश्मिरचा खरा इतिहास भावी पिढीला कळला पाहिजे. भारतीय नागरिकांना जागरुक करण्याचे काम हा चित्रपट निश्चितपणे करेल.जिस दिन भारत में सबको हमारा पूरा सच पता चलेगा उस दिन देखना पूरा भारत हमारे साथ खड़ा होगा.असा एक संवाद चित्रपटात आहे. निश्चितपणाने आज देशच नाही तर संपूर्ण विश्वभरातील नागरिक काश्मिरी हिंदू सोबत आहेत.

दरम्यान, काश्मिरी पंडितांवरील अन्याय-अत्याचाराचे चित्रण करणारा ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे.द काश्मीर फाइल्स ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर संजय लीला भन्साळी ह्यांच्या गंगुबाई काठियावाडी ह्या चित्रपटाला मागे टाकत २०२२ मधला पहिला चित्रपट आहे ज्याने वेगाने १०० करोड चा रेकॉर्ड पार केला आहे. चित्रपटात अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका निभावली आहे. त्यांच्यासोबत मिथुन चक्रवर्थी, पल्लवी जोशी व अश्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.