‘आज उद्धव ठाकरेंना कळलं असेल स्व. बाळासाहेब पवार साहेबांबद्दल किती अचूक बोलायचे’

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी मत व्यक्त केलं. राज्यसभा निवडणुकाचा निकाल हा धक्का बसणारा नाही. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी जो मतांचा कोटा ठरवला होता त्याची संख्या पाहिली तर तिन्ही पक्षांच्या कोटा मध्ये फरक पडलेला नाही. आमच्यातील कोणीही फुटलेलं नाही. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना एक मत जास्त मिळालं ते एका अपक्ष आमदाराचं होतं. त्या अपक्ष आमदाराने मला सांगूनच तसं केलं होतं. पण भाजपाने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गाने माणसं आपलीशी करण्याच्या गोष्टीमुळे त्यांना यश आलं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज्यसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. अपक्ष आमदारांच्या बाबत बोलताना ते म्हणाले, मी शब्द टाकला असता तर त्यांनी नाही म्हटलं नसतं. पण मी त्यात पडलो नाही, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे (BJP leader Nilesh Rane यांनी याच मुद्द्यावरून पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, या माणसात बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचे टॅलेंट आहे, मतांचा कोटा पवारसाहेबांनीच वाढवला आणि आता म्हणतात मी त्यात पडलो नाही. आज उद्धव ठाकरेंना कळलं असेल स्व. बाळासाहेब (Late. Balasaheb Thackeray) पवार साहेबांबद्दल किती अचूक बोलायचे आणि समजायचे. असं राणे यांनी म्हटले आहे.