मी ससूनमधून पळून गेलो नाही, मला पळवलं गेलंय –  Lalit Patil 

Lalit Patil arrest : राज्यातील अमली पदार्थ व्यापारप्रकरणातील ललित पाटीलला अटक करण्यात आली आहे. त्याला आजच तामिळनाडूच्या चेन्नईतून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, आज वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात असताना एबीपी मराठीने ललित पाटीलशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ललित पाटील पोलिसांच्या गाडीत बसण्याआधी तो म्हणाला की, “मी लवकरच पत्रकारांशी बोलणार आहे.” त्यानंतर, त्याला रुग्णालयात नेले जात असताना, “मी ससूनमधून पळून गेलो नाही. मला पळवलं गेलंय. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे हे लवकरच सांगणार आहे”, असंही ललित पाटील म्हणाला.

दरम्यान, ललित पाटील नऊ महिन्यांपासून पुण्यातील ससून रुग्णालयात होता. तो इतके रुग्णालयात का दाखल होता? रुग्णालयातून तो कसा पळाला? ससूनमधून पळाल्यानतंर तो कुठे लपून बसला होता? चेन्नईत तो कसा पळाला? चेन्नईतून तो कुठे जाणार होता? तसंच, पलायन करण्याकरता त्याला कोणी कोणी मदत केली हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहे.

https://www.youtube.com/watch?v=GNzisd4JIH4

महत्वाच्या बातम्या-

‘हमासवर इजरायलचा बॉम्ब पडताच सर्वाधिक वेदना कॉंग्रेसवाल्यांनाच होत आहेत’

‘बॉईज ४’ मधील ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र

2024 साली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार